‘कुटुंब व्यवस्था – सगे सोयरे’
‘कुटुंब व्यवस्था आणि त्याच्या एकत्र आणि विभक्त कुटुंब पद्धती’
गीता शिकत असताना पहिल्याच अध्यायात ‘कुटुंब व्यवस्था – सगे सोयरे’ या बद्दल उत्सुकता निर्माण झाली. ‘कुटुंब व्यवस्था आणि त्याच्या एकत्र आणि विभक्त कुटुंब पद्धती’ या विषयी झालेल्या सखोल चर्चेतून ‘ कोराळे बुद्रुक – बारामती’ येथील चार पिढ्या एकत्र नांदत असलेल्या भगत कुटुंबाला भेट देण्याचे ठरले. पुणे ते कोराळे बुद्रुक या मार्गावर सासवडच्या अतिशय सुंदर अशा भूमीज प्रकारात बांधलेल्या ‘चांग वटेश्वर’ देवळात महादेवाचे आशीर्वाद घेतले. जाताना वाटेत दुरून ‘सोन्याच्या जेजुरीचा’ कळस दिसला आणि गाडी आपोआप मल्हारी मार्तंडाकडे वळाली. ज्ञानदीपच्या भल्या मोठ्या आंब्याच्या बागेत मनसोक्त खेळलो, त्यांच्या कुटुंबाशी खूप छान चर्चा केली, त्यांच्या ऊसाच्या शेतातले भरघोस पीक आणि ए आय तंत्रज्ञान पाहून थक्क झालो आणि हे उंचच उंच उस जिथे साखर व्हायला जातात त्या साखर कारखान्यात जवळपास दोन तास पायपीट करत ‘zero waste’ असा बहुगुणी उस अनुभवला..