Book Procedure Now!

Edit Template

 

Ayurved ,an ancient science is for every aspect of life.
शरीरम् आद्यं खलु धर्म साधनम् !
Ayurved describes ‘शरीर’ as a medium to achieve
धर्म अर्थ काम आणि मोक्ष !

The concept of Sharir is beyond the physical body.
It is an amalgamation of different 24 tatwas like
मन, बुद्धी, अहंकार इ.

This broad spectrum helps to cure and nurture the physical,
psychological and spiritual aspects of body.

Balawant Ayurved is an authentic platform to cure the dis-alignment
of Shariras well as establishing harmony with nature through आहार, औषध, समुपदेशन आणि योग.

Ayurved ,an ancient science is for every aspect of life. शरीरम् आद्यं खलु धर्म साधनम् ! Ayurved describes ‘Sharir’ as a medium to achieve Dharm, Arth, Kam and Moksha! The concept of Sharir is beyond the physical body. It is an amalgamation of different 24 tatwas like Man, Buddhi, Ahankar etc. This broad spectrum helps to cure and nurture the physical, psychological and spiritual aspects of body. Balawant Ayurved is an authentic platform to cure the dis-alignment of Shariras well as establishing harmony with nature through Ahar, Aushadh, Samupadeshan and Yoga.

Vaidya Jyotsna Pethkar

Adapted as smiling of females oh me journey exposed concern. Met come add cold calm rose mile what. Tiled manor court at built by place fanny.

Specializations

Treatments at Balwant Ayurved Clinic

Panchkarma

Panchkarma

Customized according to the season and patient’s eligibility.
Diet Consultancy

Diet Consultancy

Personalized dietary plans based on age, profession, culture, season, and geography.
Counselling

Counselling

For stress, anxiety, and depression.
Medicinal Treatments

Medicinal Treatments

Comprehensive treatments for all ailments.

Testimonials From Patients

Manisha Shinde

मी मनीषा शिंदे , डॉ. पेटकर मॅडम यांची पेशंट आहे.मी मॅडमकडे गायनॅक प्रॉब्लेम साठी आले होते. ३-४ डॉक्टरांचे मत घेतल्यानंतर शेवटी मॅडमकडे आले. सर्व अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरांनी मला पिशवी काढण्याचा सल्ला दिला होता. पण डॉ. पेटकर मॅडम यांच्या आयुर्वेदिक उपचारामुळे माझा हा धोका टळला.आयुर्वेदिक उपचारांमुळे माझा अशक्तपणा, शरीरातील वात आणि चेहऱ्यावरचे पिग्मेंटेशन खूपच कमी झाले. विशेष म्हणजे मला ग्रोइन रिजनच्या त्रासाचे योग्य निदान झाले आणि त्यामधून आरामही मिळाला – जे निदान आजपर्यंत इतर कोणीच डॉक्टर करू शकले नव्हते.योग, आयुर्वेदिक उपचार आणि योग्य आहारपद्धतीमुळे मला मॅडमकडून उत्तम रिझल्ट मिळाला आहे.मी खूपच आनंदी आणि सुदैवी आहे की मला एवढ्या उत्तम डॉक्टरकडून माझ्या त्रासावर योग्य आणि एकाच ठिकाणी उपाय मिळाला.पिशवी काढण्याचा धोका टळला आणि माझी एनर्जी लेव्हलही वाढली — यासाठी मी मॅडमची नेहमीच ऋणी राहीन. माझ्या बहिणी स्वामीचे विशेष आभार, जिने मला मॅडमकडे जाण्यास सुचवले.आणि अर्थातच, डॉ. पेटकर मॅडम यांचे मनःपूर्वक आभार!

अतुल श्रीनिवास तळशीकर, २१ जून २०२५

मी अतुल श्रीनिवास तळशीकर. पूर्वी मला आयुर्वेदाविषयी फारसा अनुभव नव्हता. मात्र २०२४ च्या जुलै महिन्यात अचानक पोटदुखी व अपचन सुरू झालं. स्थानिक डॉक्टरांनी तात्पुरती औषधं दिली, पण त्रास कमी झाला नाही. सोनोग्राफी, फायब्रोस्कॅन, आणि काही अ‍ॅलोपॅथिक औषधं घेतल्यानंतरही समाधानकारक फरक जाणवला नाही. उलट सुप्तावस्थेतील मुळव्याधीचा त्रास वाढला आणि शस्त्रक्रिया करावी लागली. तरीही अन्न पचण्याची अडचण कायम होती.अशा वेळी माझ्या मित्र सारंग भोईरकरच्या सल्ल्याने मी बळवंत आयुर्वेद क्लिनिकमध्ये डॉ. ज्योत्स्ना पेठकर मॅडम यांना भेटलो. त्यांनी नाडीपरीक्षा करून यकृत दौर्बल्याचे अचूक निदान केले आणि काही औषधं व पथ्य सुचवलं. मी ते मनापासून पाळलं आणि आठवड्याभरातच छातीत व पोटात होणारी जळजळ कमी झाली, पचन सुधारू लागलं. तीन महिन्यांच्या उपचारांमुळे तब्येत स्थिर झाली आणि मी पुन्हा ऑफिसला रुजू होऊ शकलो.आजही थोडासा त्रास झाला तरी मी मॅडमकडे जातो. त्यांच्या औषधांनी व मार्गदर्शनाने केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आधारही मिळतो. त्या प्रत्येक रुग्णाला समजून घेतात आणि भरवसा देतात. त्यांच्या उपचारांनी मला आयुर्वेद म्हणजे मुळाशी जाणारा आणि दीर्घकालीन उपाय असतो, हे खरोखरंच जाणवलं. मागच्या आठवड्यातही तापाने त्रस्त होतो, पण दोन दिवसांत त्यांच्या औषधांमुळे बरा झालो. आज मला पूर्ण विश्वास आहे की बळवंत आयुर्वेद क्लिनिक हे पुण्यातील एक विश्वासार्ह, गुणकारी व आश्वासक उपचार केंद्र आहे.मी डॉ. ज्योत्स्ना पेठकर मॅडम यांच्याप्रती मनःपूर्वक कृतज्ञ आहे.

Madhura Gaikwad

मी अनेकदा ज्योत्स्ना मॅडम यांच्या उपचारांनी त्रासमुक्त झाले आहे, आणि विशेष म्हणजे, एकदा त्यांच्याकडे उपचार घेतल्यानंतर पुन्हा त्या त्रासासाठी परत जावे लागले नाही. पण एक अनुभव असा आहे, जो मी कधीच विसरू शकत नाही. त्या दिवशी मी एका अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांकडून उपचार घेत होते कारण मला सतत ताप येत होता आणि रात्री नऊ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत जुलाब होत होते. मी प्रचंड अशक्त झाले होते. माझी आई सतत त्या डॉक्टरांना फोन करत होती, पण त्यांनी एकदाही फोन उचलला नाही. शेवटी एक आशेचा किरण म्हणून आईने ज्योत्स्ना मॅडम यांना फोन केला, आणि मॅडमनी तो फोन लगेच उचलला. आईने परिस्थिती समजावून सांगितल्यावर त्यांनी आम्हाला लगेच पंधरा मिनिटांत क्लिनिकमध्ये बोलावले. आम्ही वेळेवर पोहोचलो, पण मला काहीही समजत नव्हतं. मॅडम स्वतः धावत आल्या, माझी नाडी तपासली, स्वतः औषध तयार केलं आणि मला चाटी दिली. अवघ्या दहा मिनिटांत मला आराम मिळायला लागला. त्यानंतर त्यांनी योग्य पद्धतीने संपूर्ण उपचार सुरू केले. काही दिवसांत मी पूर्णपणे बरी झाले. नंतर त्यांनी सांगितलं की मला पांडुरोग (पांढरी कावीळ) झाला होता आणि "वरची घंटी वाजवून" मी त्यांच्या दारात आले होते! त्या क्षणाला जर त्यांनी वेळेवर ओळखून उपचार सुरू केले नसते, तर कदाचित आज मी हे बोलूही शकले नसते. मी आज जे काही आहे, त्यामागे मॅडमचं मार्गदर्शन, वेळेवर केलेली action आणि निःस्वार्थ सेवाभाव आहे. त्यांच्या बद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. त्या केवळ एक वैद्य नाहीत, तर एक जीव वाचवणाऱ्या माऊली आहेत. त्यांच्या प्रत्येक उपचारामागे केवळ औषध नव्हे, तर मायेचा आणि काळजीचा स्पर्श असतो.

तेजस्विनी पंडित अभिनेत्री

पंचकर्मासाठी मी वैद्य ज्योत्स्ना यांच्याकडे गेले आणि तिथे आमची सुंदर मैत्री झाली.तेथे जाऊन मला समजले की पंचकर्म मनात आलं म्हणून करता येत नाही; त्यासाठी विशिष्ट ऋतू आणि शरीराची तयारी गरजेची असते. शरीरातील साचलेले दोष (toxins) बाहेर टाकण्यासाठी आपण पात्र आहोत का, हे आधी तपासले जाते.माझे पंचकर्माविषयीचे गैरसमज दूर झाले आणि वैज्ञानिक पद्धतीने शुद्धीची प्रक्रिया समजली.तुपाबद्दलची समजूत बदलली – फक्त बाहेरून नाही तर शरीर आतूनही स्निग्ध असायला हवे , ज्यासाठी रोजच्या आहारात तूप, लोणी, नारळाचे दूध यांचा समावेश आरोग्यासाठी आवश्यक आहे, हे कळले .‘आहारातून बरे होणे’ हे खरंच शक्य आहे, हे मी स्वत:अनुभवले.नीरस वाटणारे पदार्थही चविष्ट बनू शकतात, हे तिने दाखवून दिलं.एका वैद्याला पाककलेचं ज्ञान असेल तर आहार हे औषधासारखं प्रभावी ठरतं.आजार बरा करणं नव्हे, तर आजार होऊच न देणं — हाच तिचा दृष्टिकोन आहे.अशा वैद्यांची संख्या वाढली तर नक्कीच आपल्याला स्वस्थ आणि आनंदी समाज मिळेल."चिकित्सा नास्ति निष्फला" तितकंच खरं — "मैत्री नास्ति निष्फला!"

Abhijeet Ugar

बळवंत क्लिनिकच्या वैद्य ज्योत्स्ना ताई पेटकर गेली कित्येक वर्षे "दुरितांचे तिमिर जावो" या तत्त्वावर आधारित वैद्यकीय सेवा निष्ठेने, प्रेमाने आणि समर्पण भावाने बजावत आहेत. त्यांची प्रॅक्टिस ही केवळ व्यवसाय नसून एक सेवा, एक साधना आणि त्यांच्या जीवनमूल्यांची सजीव अभिव्यक्ती आहे. गरजेपुरते औषध आणि अधिक प्रमाणात जीवनशैलीतील सकारात्मक बदल हे त्यांच्या उपचारपद्धतीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. त्यांच्या जिव्हाळापूर्ण संवादातूनच रुग्णाचा अर्धा आजार हलका होतो. अचूक नाडी परीक्षण, अचूक निदान आणि अनुभवसिद्ध दृष्टिकोन यामुळे बळवंत क्लिनिकला एक वेगळीच उंची मिळाली आहे. ताई, आम्ही तुमचे मन:पूर्वक आभार मानतो आणि तुम्हाला तुमच्या पुढील प्रवासासाठी सामर्थ्य, आरोग्य आणि ऐश्वर्य मिळो यांची सदैव प्रार्थना करतो.

वैभव जोशी कवी व गीतकार

वैद्य ज्योत्स्ना पेठकर यांची भेट नेमकी कधी झाली हे आठवत नाही, पण ती झाली हेच महत्त्वाचं, कारण त्यामुळे एका चांगल्या व्यक्तिमत्वाचा माझ्या आयुष्यात शिरकाव झाला. तिच्या व्यक्तिमत्त्वातली आपुलकी, समजूतदारपणा आणि सहज संवादशैली यामुळे रुग्णाचा अर्धा त्रास कमी होतो. तिचं अचूक निदान, नाडीपरीक्षणातील कौशल्य आणि सखोल वैद्यकीय ज्ञान, सारंच विलक्षण आहे. ती केवळ औषध देत नाही, तर रुग्णाच्या जीवनशैलीत फारसे बदल न करता सोपे आणि प्रभावी उपाय सांगते. सातत्याने फॉलो-अप घेणे, विनाअहंकार संवाद ठेवणे, आणि आजार मुळातून समजून घेऊन उपचार करणं हे तिच्या कामाचे खास वैशिष्ट्य आहे. वैद्यकीबरोबरच ती ‘गोकुळ’ या शाळेतून मुलांच्या विचारक्षमतेला चालना देत असते. मला वाटतं शिक्षण पद्धतीतला "गोकुळ" हा मैलाचा दगड आहे. तिला स्वतः ला साहित्य, संगीत आणि कलेची उत्तम जाण असल्याने मुलांची जडणघडण एक रसिक म्हणून व्हावी ह्या हेतूने ती मुलांना अशा कार्यक्रमांना आवर्जून घेऊन जाते. तिचा हा बहुआयामी प्रवास आता वेबसाईटद्वारे अधिक लोकांपर्यंत पोहोचणार आहे, ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे. तिच्या या उपक्रमांना मनःपूर्वक शुभेच्छा !

सारंग भोईरकर

मानवी प्रतिभेला गुरुकृपेचा वरदहस्त लाभला कि साधकाची साधना अतिगुणित होते. तो जिथे वावरतो त्या स्थानाला आश्रमाचं, मंदिराचं अधिष्ठान प्राप्त होतं. तिथल्या लहरींवर प्रसन्नता आरूढ होते आणि अभ्यागताला इतर गोष्टींचा विसर पडतो. हि अतिशयोक्ती नसून, माझा स्वानुभव आहे डॉ.ज्योत्स्ना पेठकरांच्या बळवंत आयुर्वेदिक क्लिनिकचा. अंगावर दोन व्याधी घेऊन मी पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्या आरोग्यमंदिरातील सकरात्मकता, सद्गुरू शंकरबाबा आणि स्वामी समर्थांची तसबीर अधिक डॉ ज्योत्स्ना यांचं प्रचंड आश्वासक बोलणं यातच निम्मा आजरा कमी झाल्यासारखा मला वाटला. त्यांनी केलेलं अचूक निदान, सांगितलेली पथ्य यांमुळे दोन्ही आजरातून मी मुक्त होऊन, सावरलो आहे. धन्वन्तरीचा आशीर्वाद त्यांना आहे. तो सदैव तसाच राहो, वृद्धिंगत होत जावो हि मनोकामना. जय शंकर

KHALU JEEVANAM 

Gokul Address

Clinic address

Contact Info

© 2025 Created By  BLMedias

KHALU JEEVANAM 

Company

Business Hours

Return Policy

Privacy Policy

Terms and Conditions

About Us

About Us

Copyright Notice

Payment Methods

Shipping Information

Get Help

Offices

Shipping Options

Shipping Rates

Brief Description

Contact Info

Out believe has request not how comfort evident. Up delight cousins we feeling minutes genius.

Company

Business Hours

Return Policy

Privacy Policy

Terms and Conditions

About Us

About Us

Copyright Notice

Payment Methods

Shipping Information

Get Help

Offices

Shipping Options

Shipping Rates

Brief Description

Contact Info