१४ नोव्हेंबर बालदिन विशेष
सोशल मीडिया हट्ट की हक्क
गोकुळातले शिक्षण ‘जीवनाभिमुख’ आहे म्हंटल्यावर जीवनाशी अत्यंत निगडीत असलेल्या म्हणजेच ‘सोशल मिडिया’ या विषयावर तर चर्चा व्हायलाच हवी.
त्यात निमित्त जर बालदिनाचे असेल, तर सोशल मीडिया हा त्यांचा हक्क आहे की हट्ट? हा विषय त्यांच्या ‘सर्वांगीण जडण घडणीसाठी’ अत्यंत महत्वाचा ठरतो. घरी दारी मोबाइल मध्ये तोंड खुपसून बसलेली मंडळी बघत बघत जी मुले मोठी होत आहेत त्यांना आपणही तेच करत राहावं असं वाटणं, अगदी सहाजिक आहे. आपल्याही नकळत आपण मुलांच्या हाती काय ‘कोलीत’ देतोय याचे भान आणून देणारा कार्यक्रम ‘मुलांनी सोशल मीडिया वापरणे हा त्यांचा हट्ट की हक्क’!
आणि यासाठी ‘सोनाराकडूनच कान टोचून’ घ्यायला हवेत.
कोथरूड पोलिस चौकीतले सायबर क्राइम आणि वुमन सेलच्या अधिकारी वर्गाकडून मिळालेल्या सखोल माहितीने हे दुधारी शस्त्र वापरण्याचे ‘भान’ नक्कीच अधोरेखित झाले आहे.