Book Procedure Now!

Edit Template

ग्रीन लातूर

असं म्हणतात की ‘Every noble work is at first impossible!’.

पण जर कुणी निश्चयाचा महामेरू असेल तर त्याच्या dictionary त impossible शब्दाला स्थान नसते. अशी व्यक्ती बदल घडवताना भलेही एकट्याने प्रवास सुरू करते पण हा बदलाव इतका मोठा असतो की हळूहळू अनेक हात जोडले जातात. ( जोडले जाणे दोन्ही अर्थाने घेऊ शकता.)   

हिरवाई साठी आणि त्याच्या अनुषंगाने येणार्‍या ‘symbiotic’ नात्या गोत्यांसाठी लातूरची उजाड ओसाड भूमी आसुसलेली होती. कित्येक वर्ष तिचे गाऱ्हाणे ऐकणार कुणी नव्हतं, पण एक दिवस हे सगळं बदलायला सुरुवात झाली. अशक्य वाटलेल्या या कामासाठी एका व्यक्तीचा प्रवास सुरू झाला.

निश्चय आणि समर्पण यांच्या जोरावर सलग १५०० दिवस हा प्रवास आजही सुरूच आहे. 

सोशल वर्कच्या संदर्भात एक quote वाचली होती, ‘ I became a social worker because I want to give a voice to those who feel they are not heard’!

लातूरच्या भूमीचे हे गार्‍हाणे ऐकू शकणार्‍या अनेक सामान्यातील एका असामान्य  व्यक्तीने हे ऐकून फक्त हळहळ व्यक्त न करता प्रत्यक्ष काम सुरू केले. ते व्यक्तिमत्व म्हणजे ‘डॉक्टर पवन लड्ढा’!

मुळात वैद्य असल्यामुळे अचूक निदान करून संप्राप्ती भंग करण्याची त्यांची हातोटी त्यांच्या समाज कार्यात देखील उपयोगी पडली. स्वत:चा वैद्यकीय व्यवसाय सांभाळत ग्रीन लातूर वृक्ष टिम उभी करणे सोपे काम नाही. एकही दिवस सुट्टी न घेता लातूर हिरवे झाले पाहिजे या एका ध्यासाने ते आणि त्यांची टिम अविरत काम करतेय. हे खूप खूप कौतुकास्पद आहे.

वेगवेगळे दिवस साजरे करताना आपल्याडे वृक्ष लागवड हा इवेंट साजरा करताना तुम्हाला अनेक लोक दिसतील पण त्या नंतरच्या संगोपनाकडे मात्र पुर्णपणे पाठ फिरवली जाते.

डॉक्टर फक्त झाडे लावत नाहीत तर ती जगवतात देखील! झाडे लावून जगवून फक्त भागणार नाही तर कचर्‍याच्या साम्राज्यात माती आपले सत्व हरवते आहे, आपले शहर विद्रूप करते आहे हे लक्षात आल्यावर कचरा सफाई देखील त्याच उत्साहात ते करू लागले.

एक छोटेसे सुरू केलेले काम आज अनेकांसाठी प्रेरणा ठरते आहे. झाडे लावायची वाढवायची फक्त नाहीत तर असलेली वृक्ष संपत्ती कुणाला नष्ट करू द्यायची नाही. अनेकदा आपण हे बघतो पण त्यासाठी थांबून काही करण्याची आपली तयारी नसते. पण हीच जागरूकता निर्माण करणे आणि त्या विरुद्ध आवाज उठवणार्‍याना साथ देणे या दोन्ही बाबतीत ही टिम यशस्वी झाली आहे. या संदर्भातला त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात –

 

“सिग्नल कॅम्प भागात झाड तोडले जात आहे

अशी माहिती ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांना मिळते, टीमच्या सदस्यांनी त्या ठिकाणी जाऊन दहा-बारा फोटो काढले, अवघ्या दहा मिनिटात माननीय आयुक्त महानगरपालिका, माननीय उपायुक्त महानगरपालिका, माननीय अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका, उद्यान विभाग अधिकारी महानगरपालिका, यांना हे सगळं फोटो आणि पत्ता पाठविण्यात आला. एक सोबत ७०-८० वेगवेगळ्या मोबाईलवरून फोटो पाठवले, मेसेज केला एस.एम.एस. केले.

ताबडतोब विविध व्हॉट्सऍप ग्रुप वर ते फोटो व माहिती व्हायरल करण्यात आली, पत्रकारांच्या व्हॉट्सऍप ग्रुप वर माहिती पोस्ट करण्यात आली. सर्व वर्तमानपत्र व न्यूज चॅनेल ला मेल करण्यात आले.

नागरिकांचा हा उद्रेक पाहुन महानगरपालिकेने तातडीने संबंधित अधिकारी, संबंधित इंजिनियर, परिसरातील स्वच्छता अधिकारी, एस. आय., झोन प्रमुख यांना त्या ठिकाणी पाठवून चौकशी केली, साक्षीदारांना बोलावून सह्या घेतल्या, वृक्षतोडीबाबत नोटीस दिली. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला.”

त्यांनी आणि त्यांच्या टिमने हे दाखवून दिले आहे की ‘समाजसेवा, निसर्गसेवा किंवा विकास’ करण्यासाठी हाती सत्ताच असली पाहिजे असे नाही.

“ अपनी मेहनत के बल पर हम

अपना शहर हरा-भरा करके दिखा देंगे

भले कोई गौर करें ना करें

अपना हौसला होने देंगे ना कम”

त्यांचे एक प्रॉफेशन नोबेल तर आहेच पण त्यांचे समाजकार्य खर्‍या अर्थाने नोबेल आहे.

ग्रीन लातूर वृक्ष टिम ला खूप खूप खूप शुभेछा!

वैद्य ज्योत्स्ना पेठकर

स्वातंत्र्य लढा

June 25, 2025/

कुठलीही नवीन गोष्ट जाणून घेण्याची इच्छा होणे हे ‘उपजत’ – nature असते. काय काय नवीन गोष्टी जाणून घेता येईल हे...

सांस्कृतिक जडण घडण

June 25, 2025/

 “ अफगाणिस्तान आणि मध्य आशियातून भारतात उतरण्यासाठी खैबरखिंड हा राजमार्ग होता. या मार्गातून प्रवासी, व्यापारी, इतिहासकार, विद्यार्थी तर आलेच, आणि...

नमस्ते फ्रान्स!

June 25, 2025/

भारतीय लोक उत्सवप्रिय आहेत. त्यामुळे इथल्या राज्याराज्यात वर्षभर अनेकविध सण साजरे केले जातात. पण १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन  आणि २६...

‘ऋतुचर्या पालन’!

June 25, 2025/

काल वैद्यराज प्र. प्र. व्याघ्रसुदन यांनी ऋतुचर्येचा अत्यंत समर्पक असा लेख शेअर केला. त्यातला ‘अर्थहीन शिक्षणाचा’ मुद्दा अतिशय  relatable वाटला...

KHALU JEEVANAM 

Gokul Address

Clinic address

Contact Info

© 2025 Created By  BLMedias

KHALU JEEVANAM 

Company

Business Hours

Return Policy

Privacy Policy

Terms and Conditions

About Us

About Us

Copyright Notice

Payment Methods

Shipping Information

Get Help

Offices

Shipping Options

Shipping Rates

Brief Description

Contact Info

Out believe has request not how comfort evident. Up delight cousins we feeling minutes genius.

Company

Business Hours

Return Policy

Privacy Policy

Terms and Conditions

About Us

About Us

Copyright Notice

Payment Methods

Shipping Information

Get Help

Offices

Shipping Options

Shipping Rates

Brief Description

Contact Info